विधानपरिषदेसाठी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

मुंबई/मुक्ताईनगर, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | विधान परिषदेच्या २० जून रोजी होणाऱ्या निवडणूकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यातर्फे आज गुरुवारी दुपारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला .

राज्यात विधान परिषदेच्या दहा सदस्यांची मुदत संपण्यात आली असून त्यासाठी २० जून रोजी निवडणूक मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे आणि रामराजे नाईक- निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यानुसार आज राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आज  उमेदवारी अर्ज दाखल केला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे , माजी प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघ उपाध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर आदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!