चोपडा शहर मायनॉरिटी डेवलपमेंट फेडरेशन स्थापना

 

चोपडा, प्रतिनिधी । शहरातील सानेगुरुजी वसाहतमध्ये ऑल इंडिय मायनॉरिटी डेवलपमेंट फेडरेशन चोपडा शहर शाखेची स्थापना करण्यात आली. यावेळी महासंघाच्या नामफलकाचे उद्घाटन शहरातील कामगार नेते कॉ. अमृत महाजन यांनी केले.

सभेच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक विकास महासंघाचे राज्य अध्यक्ष सलिम पिंजारी होते. चोपडा तालुका महासंघाच्या नामफलकचे उद्घाटन कामगार नेते कॉम्रेड अमृत महाजन यांचे हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते म्हणाले की, शहरातील सानेगुरुजी नगर आपारमेंट मध्ये एकूण २००० चे वर लोक हे मागासवर्गीय व अल्पसंख्यांक आहेत. तेथे आरोग्य उपकेंद्र,उर्दु /मराठी अंगणवाडी, छोटेखानी मार्केट या सुविधा पूर्णत्वास नेल्या पाहिजेत. तसेच अपार्टमेंट छान बांधली पण त्यासोबतचे गार्डन नगरपालिकेने ते कार्यान्वित करावे यासाठी महासंघ काम करेल अशी आशा व्यक्त करून लालबावटा शेतमजूर युनियन त्यासाठी मार्गदर्शन करेल अशी ग्वाही दिली. प्रदेशाध्यक्ष सलीम पिंजारी या कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदावरुन बोलतांना म्हणाले की, अल्पसंख्यांक लोकांसाठी सरकारने शेकडो योजना जाहीर केल्या. प्रत्यक्षात हाताच्या बोटावर मोजण्याइतकेही योजना लोकांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. आम्ही महाराष्ट्र पातळीवरून या योजना अल्पसंख्यांक जनतेला मिळवून देण्यासाठी मदत करू असे सांगून त्यांनी अल्पसंख्यांक वस्तीत वाचनालय, ग्रंथालय, व्यायाम शाळा तसेच ॲम्बुलन्स असणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले. या कार्यक्रमाला श्री पिंजारी यांचे सहकारी निकम संजू बाविस्कर, सचिन इंगळे, हिरालाल सोनवणे, विजय सपकाळे, भाकपचे राज्य सचिव समिती सदस्य कॉ. शांताराम पाटील, कॉ. राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते. चोपडा शहर अल्पसंख्यांक महासंघाचे अध्यक्ष साजिद शेख, उपाध्यक्ष निसार अली, सचिव रहीम उद्दीन जागीरदार,शेख बिस्मिल्ला शेख, सुपडू खजिनदार, शेख अन्सार तसेच शेख शाहिद शेख मेहबूब, युनुस बागवान, खान अख्रतरखान या पदाधिकार्‍यांसह सर्व समिती सदस्य तरुण कामगार उपस्थित होते.

Protected Content