नगर परिषदतर्फे करण्यात येणाऱ्या वृक्ष लागवडी चौकशी करा — मनसेची मागणी

 

यावल प्रतिनिधी । येथील नगर परिषदेच्या माध्यमातुन शहरातील विविध भागांमध्ये शासनाचे लाखो रुपये खर्च करून वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेण्यात आले असुन सदरचे वृक्षरोपणाचे काम हे नियमानुसार व अटी शर्ती प्रमाणे होत नसल्याने नगर परिषदच्या जबाबदार अधिकारी यांच्या मार्गदर्शन व देखरेखीखाली सदरची वृक्ष लागवड करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मुख्यधिकारी यांच्याकडे लिखित निवेदनाव्दारे केली आहे.

या संदर्भात दिलेल्या तक्रार निवेदनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने म्हटले आहे की, मागील आठवडयापासुन यावल नगर परिषदच्या माध्यमातुन शहरातील विस्तारीत वसाहतीसह विविध ठीकाणी १४ व्या वित्तीय आयोगाच्या लाखो रूपये निधीच्या खर्चातुन सुमारे एक हजार वृक्षांच्या लागवडीचे कार्यक्रम राबविले जात असुन , या वृक्ष लागवड करण्याऱ्या संबधीत ठेकेदाराकडुन शासनाने दिलेल्या निविदेतील अटीशर्ती व नियमांचे योग्य प्रकारे पालन करतांना दिसुन येत नसुन वृक्ष लागवड करतांना ठेकेदाराकडुन तोळ्के खड्डे खोदण्यात येत असुन , सदरचे काम निकृष्ट प्रतिचे व वरवरचे दिसुन येत असुन , नगर परिषदने सदरच्या वृक्षरोपणाची प्रत्यक्ष जावुन सविस्तर चौकशी करून माहीती घेवुन नंतरच संबधीत ठेकेदाराचे बिल काढावे , ठेकेदाराकडुन होत असलेल्या वृक्ष लागवडीबद्दल नागरीकांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे . नगर परिषदने तात्काळ या वृक्ष लागवडी चौकशी करावी तसे न झाल्यास या वृक्षरोपणाची सर्वश्रीनगर परिषदची असेल अशा मागणीचे निवेदन नगर परिषदचे कनिष्ठ अभियंता योगेश मदने यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रावेर लोकसभा क्षेत्राचे जिल्हा अध्यक्ष ( जनहित ) चेतन अढळकर, शाम पवार , किशोर नन्नवरे, आबीद कच्छी गणेश कोळी यांच्या स्वाक्षरी आहे .

Protected Content