नशिराबाद टोल नाक्यावर रावेर, यावल तालुक्यालाही सवलतीची पास द्या ; भाजपाची मागणी

यावल प्रतिनिधी । राष्ट्रीय महामार्गावरील नशिराबाद टोल नाका येथे यावल व रावेर तालुक्यातील वाहनधारकांना सवलतीची पास देण्यात यावी अशी मागणी भाजपा कार्यकर्त्यांनी केली आहे.

याबाबत माहिती अशी की, राष्ट्रीय महामार्गावरील नाशिराबाद टोल नाक्यावर रावेर व यावल तालुक्यातील वाहनधारकांना  सवलतीची पास ही २७५ रुपयेची मिळवण्यासंदर्भात भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी माजी जलसंपदामंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांची भेट घेतली घेवून चर्चा केली.  दरम्यान भुसावळ तालुक्यातील वाहनधारकांना जी सवलत दिली जाते तीच सवलत यावल व रावेर तालुक्यातील वाहनधारकांना देण्यात यावी अशी मागणी केली. त्यावर माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांची टोल नाक्याचे मालक छाबडाजी व सार्वजनिक बांधकाक्ष विभागाचे कार्यकारी अभियंता सोनवणे साहेब यांच्याशी दूरध्वनी वरून संपर्क केली. यासंदर्भात येत्या एक व दोन दिवसात यावल -रावेर तालुक्यातील वाहनधारकांना मागणीची करून दिलासा देण्याचे आश्वासन दिले आहे.

याप्रसंगी यावल कृउबा सभापती हिरालाल चौधरी, जिल्हाउपाध्यक्ष अमोल जावळे, जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील, तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, तालुका सरचिटणीस विलास चौधरी, उज्जैनसिंग राजपूत, शहराध्यक्ष निलेश गडे, गणेश नेहते, नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे, कूउबाचे माजी सभापती कृषीभुषण नारायण चौधरी, जिल्हा परिषद शिक्षण सभापती रवींद्र पाटील, पंचायत समिती सभापती पल्लवी चौधरी, पंचायत समिती उपसभापती योगेश भंगाळे, पंचायत समिती सदस्य दिपक पाटील, नितीन नेमाडे, तालुका उपाध्यक्ष, यशवंत तळेले तालुका उपाध्यक्ष सागर कोळी , युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष रितेश बारी, व्यंकटेश बारी, परेश नाईक आदी उपस्थित होते .

Protected Content