सेवानिवृत्त जवानाचे निंभोरा येथे जल्लोषात स्वागत

 

पाचोरा, प्रतिनिधी । तालुक्यातील निंभोरी खु” येथील सतिष उत्तमराव नलावडे हे जवान तब्बल १९ वर्षाच्या दिर्घ सेवेनंतर ३१ जानेवारी २०२१ रोजी दिल्ली येथे सेवानिवृत्त झाले. दि. २ रोजी मंगळवारी पहाटे ७:३० वाजता झेलम एक्स्प्रेसने पाचोरा येथे आगमन झाल्यानंतर त्यांचे गावकरी व नातेवाईकांनी जल्लोषात स्वागत केले.

पाचोरा रेल्वे स्थानका पासुन ते भडगांव रोड वरील समर्थ व्हॅली पर्यंत सुमारे ५ कि. मी. अंतर वाहनात बसवुन बॅण्डच्या गजरात व फटाक्यांच्या जल्लोषात मिरवणूक ‌काढण्यात आली. यावेळी माजी सरपंच रमेश पाटील, विद्यमान सरपंच मदन वजीर तडवी, ग्रामपंचायत सदस्य आण्णासाहेब नलावडे, बाळकृष्ण धुमाळ, भगवान पाटील, भगवान नलावडे, प्रदिप खासेराव, दादा खासेराव, मधुकर नलावडे, संदिप शेळके, कैलास नलावडे, अविनाश जाधव, सचिन नलावडे, दिपक खासेराव, ज्ञानेश्रर चंदणे, हर्षल चंदणे, कृष्णा देशमुख, विशाल नलावडे, अजय देशमुख, शशिकांत देशमुख, तुषार खासेराव, जवानाची पुष्पाबाई नलावडे (आई), उत्तमराव नलावडे (वडील), अवंतीकाबाई नलावडे (पत्नी), विनोद नलावडे (भाऊ), किरण नलावडे, हर्षल देशमुख सह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

सतिष नलावडे हे दि. ४ जानेवारी २००२ रोजी अलिबाग येथे लास नायक म्हणून सैन्य दलात भरती झाले होते. त्यानंतर पुणे येथे प्रशिक्षण घेवुन जम्मु काश्मिर, राजुरी, पुंच्छ, लद्दाख, अमृतसर, जयपुर, श्रीनगर व दिल्ली अशा विविध ठिकाणी तब्बल १९ वर्ष सेवा दिली. सन – २०१० मध्ये त्यांचे हवालदार म्हणून पद्दोन्नती झाली होती.
चीनच्या सिमेवरील गलवान नाला येथे दि. १६ जुलै २०२० रोजी भारत व चीनच्या सैनिकांमध्ये चकमक झाल्यानंतर यांच्या तुकडीतील जवानांनी चीनचे ४० जवान ठार केले होते. दरम्यान महाराष्ट्रातील बुलढाणा व नांदगाव येथील दोन जवान शहीद झाल्याने त्यांना सतिष नलावडे यांनी खांद्यावर उचलुन आणत कॅम्पमध्ये दाखल केले होते. सतिष नलावडे यांना कार्डनेशन गार्ड हा पुरस्कारही मिळाला असुन देशातील प्रत्येक घरातील एका जवानाने सैन्यात भरती होवुन देश सेवा करावी व आपल्या देशाची मान उंच राहील असे कार्य करावे. तर घरी असलेल्या एका भावाने काळ्या मातीची आणि माता-पित्यांची सेवा करावी असे आवाहन ही त्यांनी तरुण पिढीला केले आहे.

Protected Content