वादळी पावसामुळे रावेर तालुक्यात पिकांसह घरांचे नुकसान; पंचनामा करण्याचे आदेश

रावेर प्रतिनिधी । रावेर तालुक्यात शनिवारी झालेल्या वादळी पावसाने मोठ्या प्रमाणात पिकांचे व घरांची पडझड झाली आहे. नुकसान झालेल्या बाधीत घरांची व नुकसान झालेल्या पिकांची तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश प्रभारी तहसीलदार संजय तायडे यांनी तलाठ्यांना दिले आहे.

या बाबत वृत असे काल रावेर तालुक्यात काल सायंकाळच्या सुमार अचानक वादळी पाऊस सुरु झाला या पावसामुळे सावदा, सुनोदा, विवरे, थोरगव्हान, पाल, खिरोदा प्र यावल आदी गांवमध्ये शेती तसेच मक्याचे नुकसान झाले आहेत. घरांचीही पडझड झाल्याचे वृत्त आहे. नुकसानग्रस्त बाधीत घरांची व शेतीच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना प्रभारी तहसीलदार संजय तायडे यांनी दिले आहे.

Protected Content