नगरदेवळा-बाळद गटात १२ कोटी रुपयांच्या कामांचे लोकार्पण व भूमिपूजन

पाचोरा, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील नगरदेवळा गावसह जवळच असलेल्या आखतवाडे, नेरी, टाकळी, खाजोळा, पिंप्री, होळ, संगमेश्वर येथे आमदार निधी व जिल्हापरिषद मधून विविध विकासकामांचे भूमीपूजन व लोकार्पण आमदार किशोर पाटील व शिवसेना जिल्हापरिषद गटनेते रावसाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

नगरदेवळा गटात आमदार निधीतून व जिल्हा परिषदच्या माध्यमातून विविध विकासकामे सुरू आहेत. यात नगरदेवळा, खाजोळा येथे प्रत्येकी २ साठवण बंधारे बांधणे, नेरी, पिंप्री, होळ, टाकळी, संगमेश्वर येथे एक एक-एक साठवण बंधारा बांधणे, खाजोळा येथे गडद नदीवर पुलाचे बांधकाम करणे. निपाने, मोहलाई पाईप मोरी डांबरी रस्ता करणे, टाकळी येथे रस्ता डांबरीकरण करणे, आखतवाडे मोहलाई रास्ता करणे. टाकळी येथे पूल बांधणे आदी कामाचे भूमिपूजन करण्यात आले. खाजोळा, आखतवाडे येथे अंगणवाडीचे लोकार्पण. नगरदेवळा उर्दू शाळा खोल्यांचे लोकार्पण. टाकळीत दलित वस्तीमध्ये काँक्रीटीकरणचे लोकार्पण तसेच घुसर्डी डांबरीकरण रस्ता लोकार्पण अश्या अंदाजित १२ कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन व उदघाटन पार पडले. यावेळी मा. सभापती अंबादास सोमवंशी, शांताराम पाटील, रवी पाटील (पिंप्री), विधासभा क्षेत्रप्रमुख अविनाश कुडे, धर्मराज पाटील, कृष्णा सोनार, वसंत जिभु पाटील, गोकुळ पाटील, महारू पवार, किरण पाटील, मनोहर ससाणे, भावडू राजपूत, प्रवीण गढरी, नूर बेग मिर्झा, भारत पाटील, विनोद पाटील, शांताराम कोष्टी,विजय चौधरी, गजेंद्र पाटील, नारायण पाटील, प्रकाश पाटील, रोशन पाटील, वाल्मिक पाटील, सागर पाटील, अनिल पाटील, दिपक पवार, भीमराव देवकर, भागवत पाटील, महेंद्र पाटील, रमेश पाटील, भैया महाजन, आनंद पाटील, सुरेश शेळके, अॅड. कैलास सोनवणे, रवींद्र पाटील, राजेश जाधव, धनराज चौधरी, यांच्यासह परिसरातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content