लहान घरांतील कोरोना रुग्णांना होम आयसोलेशन नको , सीसीसी रुग्णालयात आणा — राजेश टोपे

 

मुंबई : वृत्तसंस्था । मी आरोग्य विभागाला आवाहन केलं की, ज्यांचं घर छोटं आहे, ज्यांना विलगीकरणात राहण शक्य नाही त्यांना सरळ सरकारी सीसीसी रुग्णालयात आणलं पाहिजे. होम आयसोलेशनमध्ये ठेवू नका, त्यांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. हा महत्वाचा बदल झाला पाहिजे. लोकांनी तो पाळला पाहिजे,” असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  म्हटलं आहे.

 

 

राज्यात एकीकडे रुग्णसंख्या वाढत असताना  लॉकडाउनची  चर्चा सध्या सुरु आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला लॉकडाउनची तयारी करण्याची निर्देशही दिले होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि आनंद महिंद्रांसारख्या उद्योजकांनी लॉकडाउनला जाहीर विरोध दर्शवला आहे.

 

मोठ्या संख्येने वाढणारे रुग्ण, आपल्याकडे असणारी संसाधनं या सगळ्याचं आपण मोजमाप करतो. वाढत राहणारी संख्या पुढच्या आठवड्यात किती असेल त्यावेळी किती बेड उपलब्ध असतील याचा अभ्यास करणं यंत्रणेची गरज असते. लॉकडाउन हा विषय कोणालाच मान्य नाही, आवडत नाही,  परिस्थिती येते तेव्हा ऐनवेळी लॉकडाउन करत नसतो. तो अभ्यास कऱण्याचा विषय असतो. मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फर्निसिंगच्या माध्यमातून अनेक बैठकांमध्ये यावर चर्चा केली आहे,” असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

 

“लॉकडाउन हा शेवटी विचार करुन निर्णय घेण्याचा विषय आहे. निर्बंध कडक करायचे असतील तर कसे करायचे, उद्योगांना हात लावू नये, स्थलांतरित मजुरांचा मुद्दा झालेल्या क्षेत्राला हात लावू नये वैगेरे अशा अनेक गोष्टींचा अभ्यास होत असतो. त्या अभ्यासातून , परिस्थितीवर नजर ठेवून नंतर निर्णय घेतला जात असतो. त्यामुळे तात्काळ लॉकडाउनचा निर्णय घेतला जात नाही. निर्बंध कडक करत जावं लागतं,” असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

 

“रुग्णसंख्या वाढणं चिंतेचा विषय आहे. लोकांचा प्रतिसाद मिळाला पाहिजे. लोकांचा निर्धास्तपणा हा त्याचं मुख्य कारण आहे. कोणत्याही परिस्थितीत जे निर्बंध सांगितले आहेत ते पाळले जावेत अशी सरकारला जनतेकडून अपेक्षा आहे. लग्नाला गर्दी करु नका, विनाकारण गर्दी करु नका, मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंग गोष्टींचं पालन केलं पाहिजे,” असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

 

“मी अलीकडे जे पाहत आहे तिथे लक्षणं नसणाऱ्यांची काळजी वाटत नाही. पण ते होम कवारंटाइन असतात, बऱ्याच लोकांना छोटी घरं असतात. त्यामुळे ते आपल्यासोबत संपूर्ण घरालाही बाधित करतात. त्यांच्यावर लक्ष ठेवलं जात नाही. उपचार होत नसल्याने मग त्यांची परिस्थिती बिघडते आणि त्या अवस्थेत  ते रुग्णालयात येतात. आयसीयू आणि ऑक्सिजन बेडची गरज त्यामुळे वाढली आहे.

 

लसीकरणाविषयी ते म्हणाले की, “आपण देशात पहिल्या क्रमांकावर आहोत, पण आपल्याला गती वाढवायची आहे. पात्र लोकांच्या लसीकरणासाठी तरुणांनी पुढं आलं पाहिजे. सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते  मतदारांना बाहेर काढून मतदान केंद्रावर नेत मतांची टक्केवारी वाढवण्याचा प्रयत्न करतात त्याच धर्तीवर आपण  ४५ वर्षापुढील लोकांना बाहेर काढून लसीकरण केलं पाहिजे. यामुळे गती वाढेल

Protected Content