Home धर्म-समाज फैजपूर ते श्री क्षेत्र डोंगरदे दत्त पायीवारीला प्रतिसाद

फैजपूर ते श्री क्षेत्र डोंगरदे दत्त पायीवारीला प्रतिसाद

0
57


फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  परिसरातून प्रथमच डोंगरदे येथे जागृत पुरातन दत्त क्षेत्र सेथे वारी प्रमुख मनोज केशव होले  यांच्या नेतृत्वाखाली २ जुलै रोजी सकाळी पायीवारी १५१ भविकांसह निघाली.

 

या वारीला हंबर्डी येथे तुकाराम बोरोले कॅरटर्स यांचे चहा, हिंगोणा येथे विजय पाटील यांचे कडून नाश्ता, सांगवी येथे सतिश सरोदे याच्याकडून मसाला दूध, कठोरा येथे नितीन भिरुड यांचे कडून कोल्ड्रिंक आणि डोंगरदे येथे निवृत्ती महाजन याचे कडून जेवण देण्यात आले. श्री क्षेत्र डोंगरदे दत्त मंदिराचे गादीपती प.पू. श्री स्वरूपानंदजी महाराज यांनी पालखीचे स्वागत केले. आणि पायीवारकऱ्यांना सम्मानपत्र दिले. या पाई परीला अनमोल मार्गदर्शन दिपक होले आणि पत्रकार अरुण होले यांचे मिळाले. ही वारी यशस्वीतेसाठी जितेंद्र होले, विणेकरी राजू महाजन , जितेंद्र महाजन, चोपदार राजेश लोधी, शिरीष होले, तेजपाल चौधरी आणि अवधूत परिवार महिला भजनी मंडळ याचे सहकार्य लाभले.


Protected Content

Play sound