गुढीपाडवा निमित्त हिंदू नववर्ष स्वागत यात्रा  

अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ‘हिंदू नववर्ष स्वागत समितीच्या वतीने ‘गुढीपाडवा’ निमित्त हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील अमळनेर शहरातील राष्ट्रप्रेमी, धार्मिक, सामाजिक संस्थां आणि मंडळाच्या सहकार्याने भव्य नववर्ष स्वागतयात्रा निघणार आहे. शनिवार, दिनांक २ एप्रिल २०२२ रोजी चैत्र शुद्ध प्रतिपदा हा गुढी पाडव्याला  आपले अंगण झाडून रांगोळ्या काढाव्यात. घरात रोषणाई करून भव्य गुढी उभारावी. पुष्पवृष्टी करून किंवा आपणास शक्य होईल अशा पद्धतीने शोभायात्रेचे स्वागत करावं. शिवाय मंगल वेश परिधान करून सहकुटुंब मित्रमंडळींसह या यात्रेत सहभागी होऊन शोभायात्रेचा आनंद घ्यावा. भारतीय पद्धतीने नववर्षाचे स्वागत करावं.’ असं आवाहन विविध संघटनामार्फत करण्यात आलं आहे.

शोभायात्रेची सुरुवात बन्सीलाल पॅलेस, अमळनेर येथून सकाळी आठ वाजता होणार आहे. शोभायात्रेचा मार्ग प्रताप मिल, स्टेशन रोड, स्वामीनारायण चौक, सुभाष चौक, राणी लक्ष्मीबाई चौक, दगडी दरवाजा, तिरंगा चौक, कुंटे रोड, पवन चौक, वड चौक, त्रिकोण बाग, पाचपावली मंदिर, बस स्टँड, विजय मारुती मंदिर  मार्गे डाग बंगला ग्राउंड येथे समारोप होणार आहे.

Protected Content