जामनेरात रुग्णालय कर्मचाऱ्यांना मारहाण – पोलिसात तक्रार

जामनेर, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील आनंद मार्केट मधील भक्ती रुग्णालयामध्ये रुग्णासोबत बसण्याच्या कारणावरून कर्मचारी संदीप मुंडे याला मारहाण करून डॉक्टरवर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेचा निषेध करत जामनेर असोशियनतर्फे जामनेर पोलिसात तक्रार दाखल करून संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे

 

जामनेर शहरातील जळगाव रोडवरील आनंद मार्केटमध्ये डॉ. सचिन पाटील यांचे भक्ती नेत्रालय हे रुग्णालय आहे. दर गुरुवारी या ठिकाणी रुग्णाची तपासणी होते. गुरुवार रोजी सकाळी जामनेर बजरंगपुरा भागातील काही तरुण आपले रुग्ण तपासण्यासाठी याठिकाणी आले. यावेळी गर्दी असल्यामुळे भक्ती रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी फक्त रुग्णा जवळ एक जण बसा व बाकी बाहेर थांबा असे सांगितले. इतर महिला रुग्ण उन्हात थांबले आहे त्यांना बसायला जागा द्यायची आहे. यावेळी बजरंग पुरा भागातील काही तरुणांनी रुग्णालय कर्मचारी संदीप मुंडे यांच्याशी वाद केला तू आम्हाला बसायला जागा दे अशी हुज्जत घातल शिवीगाळ केली. यावेळी त्याला कानावर व डोक्यावर जबर मारहाण करण्यात आली. याबाबत डॉक्टर सांगायला गेले त्यावेळी त्यांनी डॉक्टर वर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र या वेळी उपस्थित लोकांनी मध्यस्थी करून वाद मिटवला. याबाबत भक्ती नेत्रालया रुग्णालयाचे कर्मचारी संदीप जयराम मुंडे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून विशाल जाधव यांच्यासह तिघांवर जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा प्रकारे डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या गाव गुंडावर कठोर कारवाई करून त्यांना शिक्षा देण्यात यावी अशी मागणी यावेळी डॉक्टर असोशियन तर्फे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना करण्यात आली. याप्रसंगी जामनेर तालुका मेडिकल असोसिएशन तालुका अध्यक्ष डॉ. अमोल शेठ, डॉ. चंद्रशेखर पाटील, डॉ. आशिष वाघ, डॉ. प्रशांत भोंडे, डॉ. स्वप्नील सैतवाल, डॉ. राजेश सोनवणे, डॉ. संदीप सरताळे, डॉ. एम. के. जैन, डॉ. पराग पाटील, डॉ, जी, डी, पाटील, डॉ, संदीप पाटील, डॉ, सचिन देशमुख, डॉ. नंदलाल पाटील, डॉ. आशिष महाजन, डॉ. विकास कळसकर, डॉ. बी. एन. सरताळे, डॉ. अमोल पाटील, डॉ. मनोज विसपुते, डॉ. सागर पंडित, डॉ. हर्षल बोहरा यांच्यासह जामनेर शहर डॉक्टर यांचे डॉक्टर आदी उपस्थित होते.

 

 

 

 

Protected Content