भुसावळ येथे चाकू हल्ल्यातील फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

WhatsApp Image 2019 09 16 at 10.32.02 AM

भुसावळ, प्रतिनिधी | भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला १९ मार्च रोजी एका विरोधात चाकू हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हातील संशयित हा ६ महिन्यापासून फरार झाला होता त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 

फिर्यादी मिथिलेस सहानी रा. श्रीराम नगर भुसावळ यास दिनांक १८ मार्च रोजी श्रीराम नगरमध्ये आरोपीने त्याच्या बहिणी सोबत प्रेम विवाह केल्याच्या कारणावरून फिर्यादीस चाकू मारून मारहाण केली होती. पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना मिळलेल्या गुप्त माहितीनुसार आरोपी दीपक उर्फ भैय्या जीवन कलाल (वय-१८ रा.हनुमान नगर भुसावळ) यास भुसावळ शहरातून नाहाटा चौफुली येथुन सापळा रचून ताब्यात घेण्यात आले आहे. गुन्हा करते वेळेस फरार आरोपी हा विधी संघर्ष बालक असल्याने त्यास बाल न्यायलय जळगाव येथे हजर करण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले ,तसेच अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके व उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड व पोलीस निरीक्षक दिलीप भागवत याच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. कॉ. सुनील जोशी, पो. ना. रमण सुरळकर, पो. कॉ. विकास सातदिवे, इश्वर भालेराव, प्रशांत परदेशी यांच्या पथकाने केली आहे. गुन्ह्याचा तपास पो. हे. कॉ. मिलिंद कंक करीत आहेत.

Protected Content