चाळीसगावात आषाढी एकादशीनिमित्त “जागर भक्तीचा” कार्यक्रम उत्साहात (व्हिडिओ)

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर भाजपा अध्यात्मिक आघाडीच्या वतीने ‘अंत्योदय’ जनसेवा कार्यालयात “जागर भक्तीचा” कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

गेल्या २ वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विठ्ठलाची वारी टळत आहे. मात्र तरी देखील वारकऱ्यांची विठ्ठल भक्ती तसूभरही कमी झालेली नाही. चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण हेदेखील वारकरी कुटुंबातील असून आमदार झाल्यानंतर देखील त्यांनी वारकऱ्यांशी नाळ तुटू दिलेली नाही.

‘विठू माउली तू, माउली जगाची”, “सुंदर ते ध्यान उभे विटेवरी” अश्या एक ना अनेक भजन – भक्ती गीतांच्या गजरात व गौळण, फुगडी खेळत विठुरायाच्या नामस्मरणात उपस्थित तल्लीन झाले होते. तसेच शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.प्रतिभाताई चव्हाण यांच्या माध्यमातून मोफत १० हजार वृक्ष वाटपाच्या ‘हरित वारी’ अभियानाचा शुभारंभ देखील यावेळी करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात आमदार मंगेश चव्हाण यांचे आईवडील श्री.रमेशनाना व सौ.कमलबाई चव्हाण यांच्याहस्ते विठ्ठलाच्या मूर्तीची पूजा करून झाली. त्यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम, शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.प्रतिभाताई मंगेश चव्हाण, भाजपा अध्यात्मिक आघाडीचे जिल्हा समन्वयक भूषण पाटील कोदगाव, भाजपा अध्यात्मिक आघाडीचे तालुकाध्यक्ष ह.भ.प.दत्तात्रय महाराज साबळे पातोंडेकर, ह.भ.प.गोरख महाराज न्हावेकर, ह.भ.प.सतिश भऊरकर, ह.भ.प.विनय महाराज हिरापूरकर, ह.भ.प.राम पाटील चाळीसगावकर, ह.भ.प.सोमनाथ कुमावत तांबोळेकर, ह.भ.प.सुभाष जगदाळे रोहिणीकर, बालगायक ह.भ.प.आदित्य विलास माळी व साई सुनील वाघ पातोंडा, ह.भ.प.सौ.दिपाली राहुल अहिरे पातोंडा, ह.भ.प.दिलीप पवार टाकळी प्रदे, ह.भ.प.अजय भावसार चाळीसगाव, ह.भ.प.अविनाश कुळकर्णी रांजणगाव, ह.भ.प.वाल्मिक जिभाऊ तांबोळे, ह.भ.प.समाधान पाटील भउर, ह.भ.प.स्वप्नील महाराज टाकळी प्रचा, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सुनील पवार,  शहराध्यक्ष भावेश कोठावदे, तालुका उपाध्यक्ष आदित्य महाजन यांच्यासह भाजपा व शिवनेरी फाउंडेशन पदाधिकारी – कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

शिवनेरी फॉऊडेशनतर्फे फराळाचे वाटप

‘जागर भक्तीचा” कार्यक्रमाला उपस्थित सर्व भाविकांना तसेच आमदार मंगेश चव्हाण यांच्या जनसेवा कार्यालयात येणाऱ्या सर्व अभ्यागतांना शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.प्रतिभाताई चव्हाण यांच्यातर्फे साबुदाणा खिचडी, केळीच्या फराळाचे वाटप करण्यात आले.

 

 

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!