पहूरला ऐतिहासिक जलकुंडाची दुर्दशा; गावाचा ठेवा जपण्याची गरज

pahur 1

पहूर ( रविंद्र लाठे )। येथील वाघूर नदीच्या तीरावर असलेल्या ऐतिहासीक गोमूख जलकुंडाची मोठी दुर्दशा झाली असून गावाचा हा जलसमृद्धीचा ऐतिहासीक ठेवा जपण्याची गरज व्यक्त होत आहे. प्राचीन जलस्त्रोत हे आजच्या काळातही जिवंत असून त्यांचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. प्रभू श्री रामचंद्रांच्या पद्स्पर्शाने पावन झालेल्या पद्मपूर ( आजचे पहूर) मध्ये प्राचीनतेची साक्ष देणाऱ्या अनेक खूणा आहेत. यापैकीच एक म्हणजे वाघूर नदीच्या तीरावर असलेले गोमूख जलकुंड.

 

22 फूट रुंद व 22 फूट लांब आकाराच्या चौरसाकृती असलेल्या या कुंडात पुर्वाभिमुख गाईचे दगडी घडावणीचे मुख बसविले असून त्यातून सदैव पाणी वाहत असते. परंतू सध्या गोमुखातून वाहणारे पाणी बंद झाले असले तरी पावसाळ्यात मात्र हा प्रवाह पून्हा सुरु होतो. या कुंडाची 15 फुटांपेक्षा अधीक खोली असून आत उतरण्यासाठी पायऱ्यांची सोय कारण्यात आली आहे. हे बांधकांम सुमारे 300 ते 400 वर्षांपूर्वीचे असल्याचे जाणकार सांगतात. सन 1931 मध्ये वाघूर नदीला आलेल्या महापूरामुळे हा कुंड पूर्णपणे गाळात गडप झाला. सुमारे 6O वर्षांनंतर गाळात गडप झालेल्या या कुंडातील गाळ गावकऱ्‍यांनी काढला अन् गोमुखाने मोकळा श्वास घेतला खरा, परंतू थोडयाच वर्षात पुन्हा या ऐतिहातिक गोमुख कुंडाची अवहेलना सुरू झाली, ती अद्यापही थांबलेली नाही. जलसंस्कृतीचे आपण उपासक आहोत. पहूरचा हा ऐतिहासिक जलस्रोत जतन करणे गरजे आहे. त्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतल्यास त्याचे संवर्धन होईल.

 

Add Comment

Protected Content