अहो आश्‍चर्यम्…गिरीशभाऊ म्हणताय स्मिता वाघ यांचा अर्ज दाखल झालाय ! ( व्हिडीओ )

जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर,भाजपच्या रक्षाताई खडसे आणि स्मिताताई वाघ यांनी कालपासूनच उमेदवारी आर्ज आज (गुरुवार) भरणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार देवकर,भाजपच्या रक्षाताई यांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. परंतु स्मिताताई वाघ यांनी जाहीर केल्याप्रमाणे आज उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. यामुळे जिल्ह्यात चर्चेला उधाण आले होते. यासंदर्भात जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी दिलेल्या प्रतिक्रीयेमुळे तर अधिकच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. पत्रकारांशी बोलतांना ना.महाजन यांनी सांगितले की, भाजपच्या दोन्ही उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. ना.महाजन याच्या या वक्तव्यामुळे प्रचंड संशयकल्लोळ निर्माण झाला असून भाजपच्या गोटासह राजकीय खमंग चर्चा रंगताय.

आज भाजप व राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज भरण्यात येणार होते. त्यानुसार आज जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर,भाजपच्या रक्षाताई खडसे यांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. परंतु स्मिताताई वाघ यांनी जाहीर केल्याप्रमाणे आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला नाही. त्यामुळे जिल्ह्यात चर्चेला एकच उधान आले होते. अनेक जण वेगवेगळे तर्क लावत होते. अगदी दिल्लीहून निरोप आला म्हणून स्मिताताई यांनी फॉर्म भरला नाही.इतपर्यंत चर्चा सुरु झाली.

दुसरीकडे विद्यमान खासदार ए.टी.पाटील हे दिल्लीत असल्याच्या आवई देखील उठली होती. भाजपची सभा आटोपल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ना.महाजन यांनी बुचकळ्यात टाकणारी प्रतिक्रिया दिली. ना.महाजन म्हणाले की, आज आमच्या दोघं उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून विजय आमचा निश्चित आहे. तर दुसरीकडे मुहूर्त हुकल्यामुळे आज उमेदवारी दाखल केला नसल्याचे तोंडी स्पष्टीकरण वाघ परिवाराकडून देण्यात आले आहे. एकंदरीत स्मिताताई वाघ यांच्या उमेदवारी अर्ज दाखल न करण्यावरून गोंधळ निर्माण झाला आहे. तर ना.महाजन यांच्या प्रतिक्रियेमुळे गोंधळात भर पडली आहे.

आपण स्वत:च पहा व ऐका गिरीशभाऊ महाजन काय म्हणत आहेत ते !

Add Comment

Protected Content