बामणोद ग्रामपंचायत पोटनिवडणूकीत प्रफ्फुल भोळे विजयी

e869d1c4 03f7 4dd4 a0f0 196e94135804

यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील बामणोद ग्रामपंचायतच्या प्रभाग क्रमांक दोनमध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत प्रफ्फुल प्रकाश भोळे हे विजयी झाले आहेत.

यावल तालुक्यातील बामणोद ग्राम पंचायत प्रभाग क्रमांक दोनचे सदस्य प्रशांत प्रमोद सरोदे हे शासकीय सेवेत नोकरीस लागल्याने त्यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. या ग्रामपंचायतच्या प्रभाग दोनसाठी दोन उमेदवार निवडणूक लढवित होते. दिनांक २३ जून रोजी मतदान झाले. यात एकुण मतदान १ हजार ३५ पैक्की ७४१ इतक्या मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता. या पोटनिवडणुकीची मतमोजणी २४ जून रोजी यावल तहसील कार्यालयात झाली. त्यात प्रफ्फुल प्रकाश भोळे हे ३७९ मते मिळवून विजयी झाले. त्यांनी आपले प्रतिस्पर्धी उमेदवार वैभव रमेश येवले यांचा ५९ मतांनी पराभव केला. येवले यांना ३३८ मतं मिळाली. या पोटनिवडणूकीचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी बी.एम.पवार यांनी काम पाहीले. त्यांना मतमोजणीस समीर तडवी (मंडळ अधिकारी यावल) आर.डी. पाटील ( मंडळ अधिकारी भालोद) आणि निवासी नायब तहसीलदार आर.के. पवार यांनी विशेष सहकार्य केले.

Protected Content