ती महिला कशीही असो….मुंडेंनी राजीनामा द्यायलाच हवा- सोमय्या

मुंबई प्रतिनिधी । धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणारी महिला कशीही असो, पण तिच्यावर बलात्काराची चौकशी झालीच पाहिजे, आणि मुंडे यांनी राजीनामा द्यायलाच पाहिजे अशी मागणी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे सध्या गोत्यात आले असून भाजप नेत्यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेत मुंडेंवर तोड डागली आहे. टिव्ही नाईन या वाहिनीशी बोलतांना त्यांनी आधीच्या आरोपांचा पुनरूच्चार करावा.

सोमय्या म्हणाले की, धनजंय मुंडे यांचे तीन-तीन बायकांबरोबर संबंध होते. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणारी महिला कशी आहे, याचा पोलिसांनी जरुर तपास करावा. मात्र, धनंजय मुंडे यांनी आतापर्यंत ही माहिती का लपवून ठेवली. धनंजय मुंडे यांनी काहीतरी केलंच असेल म्हणूनच संबंधित महिला त्यांना ब्लॅकमेल करत असेल. अशी व्यक्ती मंत्रिपदावर राहूच शकत नाही. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली.

Protected Content