ग्रंथपाल सिसोदिया यांना सेवानिवृतीनिमित्त निरोप

यावल प्रतिनिधी । जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलीत कला ,वाणीज्य व विज्ञान महाविद्यालयात ग्रंथपाल म्हणुन कार्यरत असलेले राणा तेजपालसिंग बाबुरावसिंग सिसोदीया यांना महाविद्यालयाच्या वतीने सेवानिवृत्तीपर निरोप देण्यात आला.

यावल येथील कला वाणीज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झालेल्या या निरोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संध्या एम. सोनवणे तर प्रमुख पाहुणे म्हणुन संस्था संचालक जयंतराव येवले, जिल्हा परिषदचे सदस्य प्रभाकर सोनवणे , राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा . मुकेश येवले, यावल नगर परिषदचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष शशांकदादा देशपांडे, माजी नगरसेवक तथा इंटकचे जिल्हा अध्यक्ष भगतसिंग देवनाथ पाटील उपप्राचार्य ए. पी. पाटील, उपप्राचार्य एम .डी . खैरनार, विकास यावलकर हे उपस्थित होते.

याप्रसंगी राणा तेजपालसिंग सिसोदीया यांनी ३६ वर्षाच्या महाविद्यालय सेवाकार्यात केलेल्या सेवाभावी वृत्तीच्या कार्याचा व त्यांनी केलेल्या योगदानासाठी महाविद्यालय व संस्था सदैव ऋणी राहील असे मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करतांना भावना व्यक्त केल्या. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या एम सोनवणे यांच्या हस्ते ग्रंथपाल राणा तेजपालसिंग सिसोदिया यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार करण्यात आले या प्रसंगी महाविद्यालयाचे सर्व शिक्षक वृंद कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. अर्जुन पाटील यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्राध्यापिका शोभा खराटे यांनी मानले.

Protected Content