पोलीस मुख्यालयात महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

जळगाव प्रतिनिधी । शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात राहणार्‍या महिलेने पोलीस मुख्यालयाच्या परिसरात अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला असून या प्रकरणी तिच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, पिंप्राळा हुडकोतील शारदा श्रावण मोरे या महिलेने जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालय परिसरात अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार काल सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडला. या महिलेचा मुलगा मुलगा गौरव सुरवाडे याचे ११ जानेवारी रोजी कोणीतरी अपहरण केले. या संदर्भात शारदा मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन रामानंदनगर पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, १३ रोजी गौरव हा घरी परतला. तो स्वत:च्या इच्छेने मावशीकडे गेल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. यानंतर शारदा मोरे यांनी पोलिस अधीक्षक कार्यालय गाठून अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी तीला अडवून जिल्हापेठ ठाण्याच्या ताब्यात दिले. यानंतर पोलिस कर्मचारी प्रकाश मेढे यांच्या फिर्यादीवरुन शारदा मोरे हिच्या विरुद्ध आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक विलास शेंडे तपास करीत आहेत.

Protected Content