पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । राजस सोसायटी चौकानजीक सुरू असलेल्या फनफेअरमध्ये शॉक लागून एका नऊ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना १३ एप्रिल रोजी रात्री उशिरा घडली. कात्रजमध्ये लहान मुलांसाठी असणाऱ्या फनफेअर पार्क येथे मुलाला इलेक्ट्रिक शॉक लागून मृत्यू झाला.
लहान मुलांसाठी याठिकाणी करमणूकसाठी पाळणे, फुड स्टॉल, मिकीमाउस अशी साधने उभी करण्यात आली होती. काही प्रवेश फी आकारून लहान मुलांना करमणूकीसाठी लोक येथे येत होते. पार्कमधील पाळण्यामध्ये बसताना लोखंडी पायरीवरून चढत असताना शॉक लागून मुलगा बेशुद्ध पडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी व पोलिसांकडून देण्यात आली. त्यानंतर मुलाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर नेमका मृत्यू कशा मुळे झाला याची माहिती मिळेल असे भारती विद्यापीठ पोलिसांकडून सांगण्यात आले.