पिंपरी (वृत्तसंस्था) पुलवामा हल्ल्यानंतर जवानांच्या पोस्टिंग डिटेल्सची प्रिंट जवळ बाळगणाऱ्या संशयित दहशतवाद्यांच्या साथीदारास पुण्यातील चाकण परिसरातून बिहार एटीएसने आज अटक केली आहे. शरियत मंडल असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
बिहारमधील पाटणा जंक्शन येथे एटीएसने खैरूल मंडल आणि अबू सुलतान या दोघा बांगलादेशींना काही दिवसांपूर्वी अटक केली होती. त्यांच्या चौकशीमध्ये शरियतचे नाव पुढे आले. त्यानंतर बिहार एटीएसने पुणे एटीएसच्या मदतीने चाकण पट्ट्यात छापा मारून शरियत याला अटक केली. पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. खैरूल मंडल आणि अबू सुलतान या दोघांकडे सीआरपीएफ जवानांच्या पोस्टिंग डिटेल्सची प्रिंट आढळून आली होती. तसेच इतर अनेक महत्त्वाची कागतपत्रं सापडली. यामुळे देशातील तपास यंत्रणा देखील चक्रावून गेल्या आहेत.