खंडणीच्या गुन्ह्यातील दुसऱ्या संशयित आरोपीला अटक

भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात खंडणीच्या दाखल गुन्ह्यातील दुसऱ्या संशयित आरोपीला पोलीसांनी आज अटक केली आहे.

सविस्तर माहिती अशी की, भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात खंडणी मागितल्याप्रकरणी भाग ५ अन्वये १८ जुलै रोजी दुपारी ३ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील दुसरा फरार आरोपी अमोल काशिनाथ राणे (वय-२४) रा. निवृत्ती नगर भुसावळ याला आज भुसावळ बाजारपेठ पोलीसांनी शहरातील श्रीराम नगर परिसरातील वांजोळा रोड येथून अटक केली आहे. 

यांनी केली कारवाई

उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक रविंद्र बिऱ्हाडे, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, पो.कॉ.  विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, ईश्वर भालेराव, श्रीकृष्णा देशमुख, योगेश माळी, परेश बिऱ्हाडे, जिवन कापडे यांनी संशयित आरोपीला अटक केली. पुढील तपास सपोनि अनिल मोरे व पो.ना.समाधान पाटील करीत आहेत.

 

Protected Content