नवीन बी.जे.मार्केट येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड ; सहा जणांवर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । नवीन बीजे मार्केट परिसरातील बाबा प्लाझा येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर जिल्हापेठ पोलिसांनी धाड टाकली. जुगार खेळणाऱ्या नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, बाबा प्लाझा येथे बेकायदेशीरपणे जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती जिल्हापेठ पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक प्रदीप चांदेलकर, रवींद्र साबळे, अशोक सनकत, महेंद्र बागुल, छगन तायडे, अकबर तडवी यांच्या पथकाने मंगळवारी १९ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता छापा मारला. यावेळी तेथे बन्सीलाल सोनूमल सिंधी (वय ७१, रा. सिंधी कॉलनी), एजाज खान इब्राहीम खान (वय ५१, रा. मास्टर कॉलनी), दिलीप नंदकिशोर जोशी (वय ६१, रा. भोईटेनगर), शब्बीर शेख हुसेन (वय ६९, रा. अक्सानगर), सुभाष ओंकार पावार (वय ५०, रा. खेडी, विनायकनगर), आसिफ खान अफदल खान (वय ६१, रा. शनिपेठ) या सहा जणांना जुगार खेळत असताना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून जुगार खेळण्याचे साहित्य, रोख रक्कम व सहा मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल वसंत साबळे यांच्या फिर्यादीवरून रात्री उशीरा जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास शेंडे करीत आहे.

 

Protected Content