नियमांचे उल्लंघन करून मोर्चा काढणार्‍यांवर गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । आदिवासी भिल्ल समसाजाच्या दफनभूमीच्या सातबारा उतार्‍यावर नावे लावून देण्यासह इतर मागण्यांसाठी काल जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत नियमांचे उल्लंघन केले. याप्रकरणी जिल्हाध्यक्ष विजय गायकवाड यांच्यासह सुमारे ३०० ते ४०० जणांविरुद्ध रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, एकलव्य आदिवासी भिल्ल समाज संघटनेच्या विविध मागण्यांसाठी काल सोमवारी १९ जुलै रोजी दुपारी १ वाजता कोर्ट चौकातील शिवतीर्थ मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला होता. दरम्यान, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिलेल्या आदेशान्वये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी करण्यास मनाई करण्यात आली आहे.  एकलव्य आदिवासी भिल्ल समाज संघटनेने मोर्चा काढण्यासाठी कोरोनाचा संसर्ग असतांना अनावश्यक गर्दी जमविली होती. याप्रकरणी काल मंगळवारी १९ जुलै रोजी रात्री उशीरा जिल्हाध्यक्ष विजय गायकवाड, सुर्यकांत पवार, कार्याध्यक्ष अनिल सोनवणे, रवी मोरे, अक्षय मालचे, विशाल मोरे, देविदास बहीरम, विजय ठाकरे, राजू सोनवणे, मोतीलाल सोनवणे यांच्यासह सुमारे ३०० ते ४०० जणांविरुद्ध कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ ब साथीचे रोग साथ यासह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कायद्यान्वये जिल्हा पेठ  पोलिस कर्मचारी उमेश पाटील यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास विजयकमार सोनार हे करीत आहे.

 

Protected Content