अपक्ष आमदारांनी पत्ते पिसले आहेत फक्त टाकायचे बाकी – आ.रवि राणा

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | अनेक अपक्ष आमदार माझ्या संपर्कात असून राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अपक्ष आमदारांनी पत्ते पिसले आहेत. फक्त ते १० तारखेला केवळ टाकायचे बाकी असल्याचे आ. रवि राणा यांनी म्हटले आहे.

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातले राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपा यामध्ये राज्यसभेची निवडणूक होणार असून अपक्ष आमदारांनी आपल्यालाच मतदान करण्यासाठी राजकीय खेळी रंगवल्या जात आहेत.

यावर शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी महाविकास आघाडी राज्यात सत्तेत असून आम्ही पूर्ण ताकदीने या निवडणुकीत उतरलो आहोत. सहाव्या जागेसाठी भाजपा अपक्ष किंवा इतर पक्षांवर अवलंबून आहे. आणि अपक्षांवर ईडी-सीबीआयच्या माध्यमातून दबाव आणला जात आहे. ज्यांच्यावर दबाव आणले जात आहेत, ते आमचे मित्र असून तेच आम्हाला हे सांगत असल्याचा आरोप खा. संजय राऊतांनी आज पत्रकारांशी बोलताना केला होता.
यावर अपक्ष आ. रवि राणा यांनी, गेल्या वेळी संजय काकडे यांना राज्यसभेत पाठवण्यासाठी अपक्ष आमदारांनी मोठी ताकद पणाला लावत अपक्ष आमदारांनी मिळून अपक्ष खा. संजय काकडे यांना निवडून दिले होते. त्यामध्ये मी देखील होतो. त्यामुळे यावेळीसुद्धा अपक्ष आमदारांनी पत्ते पिसून ठेवले असून ते फक्त टाकायचे बाकी असल्याचा टोला शिवसेनेचे खा. संजय राऊत यांना लगावला आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!