पाळधी उपक्रेंदात शिक्षण परिषद संदर्भात बैठक; विविध विषयांवर चर्चा

पहूर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जाननेर तालुक्यातील पाळधी केंद्राची शिक्षण परिषद केंद्र प्रमुख बाबुराव धुंदाळे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली. या परिषदेत गटशिक्षणाधिकारी आर. ए. लोहार, केंद्रप्रमुख संदीप पाटील, केंद्रप्रमुख विकास वराडे, केंद्रप्रमुख भानुदास तायडे आणि विषय तज्ज्ञ पंकज रानोटकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात केंद्रातील शिक्षकांनी शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी आपले अनुभव सादर केले. निपुण मध्य चाचणीचे विश्लेषण आणि यशोगाथा सादरीकरण करण्यात आले.

प्रशासकीय विषयांमध्ये निपुण मध्य चाचणीच्या निकालांच्या आधारे प्रत्यक्ष कार्यवाही करणे, अपार आयडी संदर्भातील कार्यवाही आणि अप्रगत मुलांना इतर मुलांबरोबर आणण्यासाठी योजनाबद्ध कार्यवाही करण्यावर भर देण्यात आला. केंद्रप्रमुख बाबुराव धुंदाळे यांनी या संदर्भात सर्व शिक्षकांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमात, सुनसगाव बुद्रुक शाळेचे शिक्षक आत्माराम कुंभार यांना सेवानिवृत्तीनिमित्त केंद्राच्या वतीने निरोप देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी परदेशी आणि डॉ. रत्नकांत सुतार यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक उपेंद्रकुमार आढाव यांनी केले.

Protected Content