ना. गुलाबराव पाटलांच्या बंगल्यावर नाराजांसोबत चर्चा

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकनाथ शिंदे यांच्या गटाने माघारीला सपशेल नकार दिला असतांनाच राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या बंगल्यावर शिंदे यांच्या गटातील सहकार्‍यांशी चर्चा सुरू आहे.

एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत असणारे दादा भुसे, संजय राठोड आणि संजय बांगर हे आज दुपारी मुंबईत शिंदे यांचा संदेश घेऊन आले. त्यांनी शिंदे यांची मागणी आणि प्रस्ताव नेतृत्वाला सादर केला असून याला नाकारण्यात आले आहे. दरम्यान, यानंतर ना. गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानी बैठक सुरू झाली आहे.

या बैठकीला मंत्री उदय सामंत, अनिल परब यांच्यासह शिवसेनेचे बडे नेते उपस्थित आहेत. याप्रसंगी माजी मंत्री संजय राठोड यांची सुध्दा उपस्थिती आहे. ते शिंदे यांच्या दूताची भूमिका बजावत असल्यामुळे शिवसेनेच्या मंत्र्यांनी त्यांची समजूत काढून पक्षासोबत येण्यासाठी त्यांना गळ घातली आहे. एका अर्थाने ना. गुलाबराव पाटील यांचा बंगला मुंबईतील राजकीय घडामोडींचा केंद्रबिंदू बनला आहे. गेल्या तासभरापासून ही बैठक सुरू असून यात नेमकी कशावर चर्चा झाली याचा तपशील अद्यापही समोर आलेला नाही.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content

%d bloggers like this: