भाजप सोबतच सरकार बनवा : शिंदे गटाची मागणी

सूरत-वृत्तसंस्था | एकनाथ शिंदे यांच्या गटाने शिवसेना नेतृत्वाचा प्रस्ताव फेटाळून लावत भाजप सोबतच सरकार बनवा अशी मागणी रेटून धरली आहे.

 

एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी आज दुपारी मिलींद नार्वेकर हे आमदार गोगटे यांच्यासह सूरत येथील हॉटेल मेरेडियन येथे पोहचले. याप्रसंगी त्यांची ना. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असणार्‍या बंडखोर आमदारांसोबत विस्तृत चर्चा झाली. याप्रसंगी नार्वेकर यांनी त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न केले. तथापि, त्यांनी याला सपशेल नकार दिला आहे.

 

हिंदुत्वाच्या मुद्यावरूनच भारतीय जनता पक्षासोबतचे सरकार हे शिवसेनेच्या हिताचे असल्याने पुन्हा भाजपसोबत सरकार बनविण्याची मागणी बंडखोर आमदारांनी केली. दरम्यान, मिलींद नार्वेकर आणि आमदार फाटक यांच्याशी झालेली चर्चा ही निष्फळ ठरल्यामुळे आता पुढे काय होणार ? याबाबत मोठा सस्पेन्स निर्माण झाला आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!