सावदा येथे भाजपातर्फे योग शिबीर उत्साहात

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील स्वामीनारायण नगरातील हनुमान मंदीर परिसरात बेटी बचाव बेटी पढाओ अभियान व भाजपाच्या वतीने मंगळवारी सकाळी योग शिबीर घेण्यात आले.

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून जिल्हा अध्यक्ष आ राजु मामा भोळे,मा.जलसंपदामंत्री आ गिरीश भाऊ महाजन,खा.रक्षाताई खडसे व खा.उन्मेशदादा पाटील राष्ट्रीय संयोजक डॉ राजेंद्रजी फडके प्रदेश संयोजक डॉ शुभा पाध्ये  यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक २१ जुन २०२२ रोजी सकाळी ९  ते १० वाजता शिव – हनुमान मंदिर,स्वामीनारायण नगर,सावदा येथे  बेटी बचाव बेटी पढाओ अभियान व भारतीय जनता पार्टी सावदा शहर यांचे संयुक्त कार्यक्रमा अंतर्गत भव्य योग शिबिर आयोजित करण्यात आले.

 

या कार्यक्रमाला योगशिक्षीका स्वाती गवळी, योगशिक्षक राकेश पाटील यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, भाजप शहराध्यक्ष जे.के.भारंबे, माजी नगराध्यक्ष देवयानी बेंडाळे, महिला आघाडी अध्यक्षा भाजपा रेखाताई बोंडे, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सागर चौधरी, सावदा सरचिटणीस संतोष परदेशी,  महेश अकोले, युवा मोर्चा अध्यक्ष सर्वेश लोमटे, तुषार चौधरी यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि साधक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  शिबीराचे आयोजन शिबिराचे आयोजन बेटी बचाओ बेटी पढाओच्या जिल्हा संयोजक सारीका चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्या यांनी परीश्रम घेतले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.