मलिंगा ठरला टी-20 स्पर्धेत विकेटचे शतक पूर्ण करणारा पहिला गोलंदाज

malinga 1

कँडी वृत्तसंस्था । श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने शुक्रवारी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 विकेट्स पूर्ण करणारा पहिला गोलंदाज ठरला.

याबाबत अधिक माहिती अशी की, लसिथ मलिंगाच्या या कामगिरीसह त्याने न्यूझीलंड विरुद्ध टी-२० मालिकेच्या तिसर्‍या आणि शेवटच्या सामन्यात कोलिन मुनरोच्या विकेटने त्याने हा पराक्रम केला. त्याने 76 व्या सामन्यात हा पराक्रम केला. मालिकेतील अखेरच्या टी-२० सामान्यात श्रीलंकेने ८ बाद १२५ धावा केल्या. यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव ८८ धावांतच आटोपला. यात तिसऱ्या षटकातील तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर मलिंगाने अनुक्रमे कॉलिन मुन्रो, हामिश रुदरफोर्डस कॉलिन डीग्रँडहोम, रॉस टेलर यांना बाद केले. एक वेळ न्यूझीलंडचा निम्मा संघ २३ धावांत माघारी परतला होता. तळाच्या टीम साउदीने नाबाद २८ धावा करून न्यूझीलंडची आणखी नामुष्की टाळली. श्रीलंकेने ही लढत ३७ धावांनी जिंकली. मलिंगाने ४ षटकांत १ षटक निर्धाव टाकून सहा धावांत पाच विकेट घेतल्या. ३६ वर्षीय मलिंगाच्या नावावर ७६ टी-२०त १०४ विकेट जमा आहेत. पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीच्या नावावर ९८ विकेट आहेत. टी-२०त मलिंगाची ही दुसरी हॅटट्रिक ठरली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ही त्याची पाचवी हॅटट्रिक ठरली. २००७च्या वर्ल्ड कपमध्ये मलिंगाने अशीच कामगिरी केली होती.

Protected Content