मतदान झाले, वैमनस्यही संपले : बुलढाण्यातील उमेदवारांचा ‘असाही’ उमदेपणा !

बुलढाणा-अमोल सराफ | एकीकडे राजकारण हे एकमेकांसोबतच्या वैमनस्यामुळे बदनाम झाले असतांना बुलढाण्यात मात्र नरेंद्र खेडेकर आणि रविकांत तुपकर या नुकत्याच लोकसभा लढविलेल्या उमेदवारांनी या समजाला छेद देत उमदेपणाचे दर्शन घडविले आहे.

बुलढाणा लोकसभा मतदारसंघाकरता २६ एप्रिल रोजी मतदान पार पडले. या निवडणुकीच्या रिंगणात मुख्यतः महाविकास आघाडी कडून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर महायुतीकडून विद्यमान खासदार शिवसेना प्रतापराव जाधव आणि अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर हे रिंगणात होते. या तिघांमध्येच तिरंगी लढत असली तरी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केल्यानंतर जेव्हा काल जिल्ह्यात एक सर्वांचे मन जिंकून घेणार छायाचित्र समाज माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

यामध्ये महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे लोकसभेचे उमेदवार नरेंद्र खेडेकर आणि अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर हे एकमेकांच्या हातात हात देत चेहरावर हास्य फुलत असल्याचे चित्र आहे. खेडेकरांनी तुपकर यांची मतदानाच्या नंतर भेट घेतली. या दरम्यान त्यांनी जवळपास अर्धा तास मोकळ्या गप्पा देखील केल्याचं सांगितल्या जात आहे.

एकीकडे पक्ष फोडाफाड गटातटाचे राजकारण खालच्या स्तरापर्यंत अपप्रचार हे सध्या राजकारणात मोठ्या प्रमाणात होत असताना; बुलढाणा जिल्ह्यात मात्र मतदानाच्या दुसर्‍या दिवशी एका सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दोनही विरोधी उभे ठाकलेले निवडणुकीतले उमेदवार जेव्हा सर्वसामान्यांसमोर अशी मुद्रा घेऊन येतात. तर चर्चा तर होईलच .आणि निश्चित याच भावना कार्यकर्त्यांना देखील अपेक्षित आहे.

निवडणूक झाल्यानंतर सर्व मतभेद हेवे दावे विसरून पुन्हा जिल्ह्याच्या किंबहुना सर्वसामान्य करता आपण कसं एकत्र एका व्यासपीठावर येऊन प्रगतीचा रस्ता समृद्धीकडे येऊ शकतो हेच या लोकप्रतिनिधी आदर्श ठेवणं सर्वसामान्य कडून अपेक्षित आहे. एकंदरीत लोकप्रतिनिधींची प्रत्येक छोटी मोठी केलेली कृती ही चर्चेत ठरली असून सोशल मीडियात देखील मोठ्या प्रमाणात या फोटोला सध्या दाद मिळत आहे. या उमदेपणाला समाजमाध्यमात सकारात्मक कॉंमेंटच्या माध्यमातून चांगलीच प्रसिध्दी देखील मिळत आहे.

Protected Content