समोरासमोर दोन दुचाकीच्या अपघातात पत्रकार जखमी

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील शेळगावमार्गे जळगाव जाणाऱ्या रस्त्यावरील बोरावल गावाजवळ वळणावर यावल पत्रकार सुधाकर चौधरी (५२)यांचे दुचाकीला अज्ञात दुचाकीस्वाराने धडक दिल्याने झाल्याची घटना घडली आहे. या अपघात प्रकरण यावल पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकी चालकाविरुद्ध तक्रार देण्यात आली आहे.

याबाबत अधिक असे की, यावल बोरावल टाकरखेडा, शेळगाव मार्गे जळगाव जाणारा रस्ता आहे. या रस्त्यावरून २३ एप्रिल मंगळवार रोजी सुधाकर नारायण चौधरी वय ५२ रा. चुंचाळे ता.यावल हे दुचाकी क्रमांक (एम.एच.१९ ए.व्ही. ९६७४) द्वारे जळगाव कडून यावल कडे येत होते. दरम्यान बोरावल ते टाकरखेडा रस्त्यावर बोरावल शिवारात वळणावर त्यांच्यासमोर अचानक भरधाव वेगात एक अज्ञात दुचाकी स्वार आला व त्याने चौधरी यांच्या दुचाकीच्या डिक्कीला आणि सायलेन्सरला धडक दिली. या अपघातात सुधाकर चौधरी यांच्या डोक्याला, छातीला, हाताला, पायाला, कमरेला दुखापत झाली व त्यांच्या मोटरसायकलचे नुकसान झाले. तेव्हा प्रकरणी त्यांनी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकी चालका विरूध्द तक्रार नोंदवण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार नितीन चव्हाण करीत आहे.

Protected Content