येत्या १ मे पासून होणार जनगणनेला सुरूवात

janganana

मुंबई प्रतिनिधी । नागरिकत्व दुरुस्ती कायदा, नागरिकांसाठी राष्ट्रीय रजिस्टर आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी या संदर्भात देशात सध्या सुरू असलेल्या चर्चेदरम्यान मोदी सरकारने जनगणना २०२१ वर काम सुरू केले आहे. केंद्राकडून नवीन गॅझेट प्रसिद्ध करण्यात आले आहे. नव्या दशकासाठी जनगणनेच्या कामाला येत्या १ मे २०२० पासून सुरुवात होणार आहे.

जनगणनेदरम्यान विचारल्या जाणाऱ्या 31 प्रश्नांची यादी आहे. जनगणनेदरम्यान सामान्य लोकांना एकूण 31 प्रश्न विचारले जातील. जनगणना कायदा कलम ८ च्या उपकलम १ नुसार होणार होत असलेल्या जनगणनेसाठी सरकारने सर्व जनगणना कार्यालयांना प्रश्नावली पाठवली आहे. या प्रश्नांमध्ये घराच्या मालकाचे नाव, घर क्रमांक आणि घराच्या स्थितीसह अनेक प्रश्नांचा समावेश आहे.

Protected Content