Home क्राईम यावल तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत दोन तरुणांचा आत्महत्येचा प्रयत्न

यावल तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत दोन तरुणांचा आत्महत्येचा प्रयत्न

0
101

2013 7 19 Suicide with pillsΑυτοκτονία με την λήψη φαρμάκου δηλητηρίου

यावल,प्रतिनिधी | तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत दोन तरुणांचा आत्महत्येचा प्रयत्न केला. यात एकाची प्रकृती गंभीर आहे. दोघांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे.

यावल तालुक्यातील सातोद येथील राहणारा चंदु देवीदास कुरकुरे (वय ३२ वर्ष) यांने विषारी किटनाशकऔषद्य प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यास यावल येथील ग्रामीण रुग्णालयात आज सकाळी ८वा उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. परंतु, त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्यास पुढील उपचारास जळगाव पाठविण्यात आले आहे. दुसऱ्या घटनेत तालुक्यातील वाघोदा येथे राहणारा गोमा गणेश भिल (वय २६ वर्ष) याने देखील विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला असुन गोमा भिल यास देखील जळगाव पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.


Protected Content

Play sound