मुन्नाभाईच्या नावाने मामू मिळाले : दीपाली सैय्यद यांचा टोला

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेना नेत्या दीपाली सैय्यद यांनी आज पुन्हा राज ठाकरे यांच्यावर टीका करतांना महाराष्ट्राला मुन्नाभाईच्या नावाने मामू मिळाल्याचे सांगत मनसेला खिजवले आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, दीपाली सैय्यद या गेल्या काही दिवसांपासून मनसेवर टीका करत असून त्यांनी आज पुन्हा एकदा या पक्षाला लक्ष्य केले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे लवकरच पुण्यात सभा घेणार असल्याचं मनसेकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. त्याचसंदर्भात राज ठाकरे पुणे दौर्‍यावर देखील आले होते. मात्र, अचानक ऐनवेळी त्यांची सभा पुढे ढकलण्यात आल्यामुळे त्यावरून तर्क-वितर्क लढवले जाऊ लागले आहेत.

या घडामोडींनंतर दिपाली सय्यद यांनी जारी केलेल्या व्हिडीओमध्ये उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना दिलेल्या मुन्नाभाई या उपमेचा उल्लेख करत निशाणा साधला आहे. पावसाचं कारण सांगून मैदान सोडले. भोंग्याचे कारण सांगून देशपांडे पळाले. आयोध्येचे कंत्राट अर्धेच मिळाले. महाराष्ट्राला मुन्नाभाईच्या नावाने मामू मिळाले, असं दिपाली सय्यद या व्हिडीओमध्ये म्हणताना दिसत आहेत.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!