सर्वच धार्मिक स्थळांना भोंगेबंदी लावा- रशीद अल्वी

नवी दिल्ली,  लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | देशात जर भोंगे हे भांडण आणि हिंसाचाराचे कारण होत असेल तर देशभरातील सर्वच धार्मिक स्थळांवरील भोग्यांवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते रशीद अल्वी यांनी केली आहे.
देशभरात अनेक ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून विविध धर्मीयांमध्ये भांडणे सुरु आहेत. जर भोंगे हेच मूळ कारण असेल तर यावर बंदी घातली पाहिजे. देशात फक्त विकासाचा नारा दिला जातो. परंतु विकास कोठेहि झालेला दिसून येत नाही. देशभरात द्वेषाचे वातावरण असून त्याला भाजपाध्यक्ष जे.पी.नडडा हेच जबाबदार असल्याचे अल्वी यांनी म्हटले आहे.
देशभरात अत्यंत वाईट वातावरण असून सरकारच्या माध्यमातून अनेक घटना घडलेल्या आहेत. प्रशासनाला हवे असते तर असे झाले नसते. लाउडस्पीकर हे वादाचे कारण असेल तर सर्वच धार्मिक स्थळांवरील लाउडस्पीकर बंदी घालावी असे म्हटले असून, दिल्लीतील जहांगीरपुरी परिसरातील हिंसाचारावर देखील रशीद अल्वी यांनी प्रतिक्रिया दिली होती.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content