देवदर्शनासाठी जर कुणाला अडवत असाल तर याद राखा, -कांचनगिरी

देवदर्शनासाठी हिंदुनी नाही तर मुघलांनी यायचे का?

नवी दिल्ली, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध पाहता,  राजकीय लढाई करायची असेल तर जरूर करा, पण देवदर्शनासाठी जर कुणाला अडवत असाल तर याद राखा, सर्व साधुसंतांचा राज ठाकरे यांना पाठींबा असल्याचे साध्वी कांचनगिरी यांनी म्हटले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ५ जून रोजी अयोध्येला जाणार आहेत. परंतु उत्तर भारतीयांची माफी मागा, अन्यथा राज ठाकरेंना अयोध्येत पाय ठेऊ देणार नसल्याची भुमिका घेत भाजपा खा.ब्रृजभूषण शरण सिंह यांनी ठाकरेना विरोध दर्शवला आहे. यावर ब्रृजभूषण यांना आवरा, राज ठाकरेंना अयोध्येला येऊ द्या, अशी मागणी खा.ब्रृजभूषण सिंह यांना आवर घालण्यासाठी साध्वी कांचनगिरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

राज ठाकरे यांनी राज्यातील मशिदीच नव्हे सर्वच धार्मिक स्थळावरील कर्णकर्कश आवाजामुळे होणारा त्रास पाहता भोंगे हटविण्यात यावे यासाठी योग्य पाउल उचलले आहे. त्यांचा हिंदुत्वाचा मुद्दा बरोबर असून खा.ब्रृजभूषण सिंह हे केवळ राजकीय खेळी करत असून ब्रृजभूषण सिंह यांचा स्वताकडे पाहावे, ज्यांचे हात रक्ताने माखले आहेत त्यांनी त्यांचा इतिहास काढण्याची वेळ आणू नये. उत्तर प्रदेश वासीयांची काळजी असती तर येथेच कारखाने फॅक्टरी उभारून यूपीतील नागरिकांना सक्षम बनवून काम दिले असते.

राज ठाकरेंना रोखण्याचा प्रयत्न करू नका, देवदर्शनासाठी हिंदुनी नाही तर मुघलांनी यायचे का? असा प्रश्न उपस्थित करीत ओवेसिसारखे म्हणतात एक तासासाठी पोलीस हटवा मग बघा, त्याच्या विरोधात काम करा. ब्रृजभूषण यांचा हा केवळ स्टंट असून राज ठाकरे माफी मागणार नाहीत, असेही कांचनगिरी यांनी म्हटले आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!