मैत्रेय कंपनीमध्ये गुंतवणुकधारकांच्या परताव्याबाबत मंत्रालयात मंगळवारी बैठक

पाचोरा, प्रतिनिधी । मैत्रेय कंपनीमधील गुंतवणूकदारांना योग्य तो कायद्यानुसार परतावा मिळावा अशी मागणी होत होती. यानुसार गृहराज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले असून या बैठकीला आ. किशोर पाटील हे देखील उपस्थित राहणार आहे.

मैत्रेय कंपनीमध्ये गुंतवणुकधारकांना योग्य तो कायद्यानुसार परतावा मिळावा यासाठी मंगळवार दि. १२ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता मंत्रालयात गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांचे अध्यक्षतेखाली महत्त्वपुर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. याबैठकीस पाचोरा – भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील, अ. मु. स. गृह विभाग, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उप आयुक्त (मुंबई), यांचे सह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. राज्यातील बहुतांशी नागरिकांनी मैत्रेय कंपनीमध्ये गुंतवणुक केली आहे. मैत्रेय कंपनीने कोणत्याही स्वरुपाचा परतावा गुंतवणूकधारकांना दिला नसल्याने या संदर्भात आ. किशोर पाटील यांनी पाठपुरावा सुरू ठेवला आहे. सन २०२० या गेल्या वर्षी कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातले असल्याने हा विषय प्रलंबित होता. मात्र, याबाबत मंत्रालयात बैठक होऊन तोडगा निघेल अशी अपेक्षा गुंतवणूकदारांनी व्यक्त केली आहे.

Protected Content