पाचोरा नविन पोलिस निवासस्थान व कार्यालय उभारणीसाठी मंत्रालयात मंगळवारी बैठक

 

पाचोरा, प्रतिनिधी । राज्यातील विविध पोलिस निवासस्थान व कार्यालयांचे नविन बांधकाम संदर्भात मंगळवार दि. १२ जानेवारी दुपारी तीन वाजता राज्याचे गृहमंत्री शंभुराजे देसाई यांचे अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली आहे.

बैठकीत पाचोरा- भडगाव शहरातील पोलिस कर्मचाऱ्यांची व अधिकाऱ्यांची जुनी निवासस्थानांच्या जागी नविन निवासस्थाने व नविन प्रशासकीय इमारत बांधकाम करण्याकरिता मंजुरी व निधी मिळण्यासाठी पाचोरा – भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांनी नियमित पाठपुरावा करून या बैठकीत सदरचा विषय मार्गी लागणार आहे. बैठकीत राज्यमंत्री बच्चु कडु, खासदार सुनिल तटकरे, आमदार अनिल बाबर (सांगली), आमदार किशोर पाटील (पाचोरा – भडगाव), आमदार प्रा. रमेश बोरनारे, पोलिस महासंचालक (पोलिस गृहनिर्माण महामंडळ, मुंबई), अप्पर पोलिस महासंचालक (नियोजन व समन्वय, मुंबई), मुंबई गृह विभागाचे उपसचिव, विशेष पोलिस महासंचालक (कोल्हापूर), अमरावती, औरंगाबाद, कोकणसह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Protected Content