जितो संघटनेतर्फे उद्या चर्चासत्राचे आयोजन

jito jain sanghatana

जळगाव प्रतिनिधी । जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन अर्थात जितो या संघटनेतर्फे उद्या रविवारी अल्पसंख्यांकांना उपलब्ध असणार्‍या लाभांबाबत चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

या चर्चासत्राला पुणे येथील अ‍ॅडव्होकेट योगेश मेहता यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. ते केंद्र व राज्य सरकारतर्फे अल्पसंख्यांक समुदायाला देत असणार्‍या विविध योजना आणि यांचा लाभ कसा घ्यावा याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. जैन समाज हा सरकारी सुविधा घेण्याबाबत नेहमीच पीछाडीवर राहिलेला आहे. या पार्श्‍वभूमिवर, संबंधीत चर्चासत्र हे अतिशय महत्वाचे असून याला उपस्थित राहण्याचे आवाहन सकल जैन श्रीसंघ आणि प्रकल्प प्रमुख श्रेयस कुमट व प्रतीक शाह यांनी केले आहे. हे चर्चासत्र शहरातील कांताई सभागृहात रविवारी दुपारी तीन वाजता होणार असल्याचे कळविण्यात आले आहे.

Protected Content