जळगावच्या विकासात्मक दृष्टीने खा.उन्मेष पाटलांना महापौर भारती सोनवणे यांचे निवेदन

जळगाव प्रतिनिधी । केंद्र सरकारचा अर्थसंकल्प नुकतेच सादर करण्यात आला असून जळगाव शहराचा फायदा होण्यासाठी काही तरतुदींचा आणि विकासात्मक बाबी अर्थसंकल्पात  समावेश करून त्याचा पाठपुरावा करावा असे निवेदन महापौर भारती सोनवणे यांनी खा.उन्मेष पाटील यांना दिले आहे. 

केंद्र सरकारचा अर्थसंकल्प नुकतेच सादर करण्यात आला असून राज्यासाठी देखील त्यात तरतूद करण्यात आलेली आहे. जळगाव शहर विकासाच्यादृष्टीने काही तरतूद करण्यासाठी महापौर सौ.भारती सोनवणे यांनी खा.उन्मेष पाटील यांना निवेदन दिले असून जळगाव शहरासाठी प्राधान्याने केंद्राकडे पाठपुरावा करावा अशी मागणी केली आहे.

केंद्र सरकारने देशात काही क्रिटिकल केअर सेंटर उभारण्याचे अर्थसंकल्पात जाहीर केले आहे. जळगाव शहरातील कोरोनाचा इतिहास लक्षात घेता शहरात क्रिटिकल केअर सेंटर तयार करणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने तरतूद केलेले क्रिटिकल सेंटर शहरात तयार करण्यासाठी मनपा प्रशासनाकडून जागा आणि आवश्यक त्या पूर्तता तातडीने करण्यात येतील तरी आपण शासनाकडे तत्परतेने पाठपुरावा करावा अशी मागणी देखील महापौर सौ.भारती सोनवणे खा.उन्मेष पाटील यांच्याकडे केली आहे.

Protected Content