चाळीसगाव येथे सेवापुर्ती निरोप समारंभात पुस्तक प्रकाशन सोहळा उत्साहात

चाळीसगाव प्रतिनिधी ।  राष्ट्रीय विद्यालय सिनियर कॉलेज येथून प्राध्यापक पदावरून प्रा. गौतम निकम हे ६० व्या वर्षी सेवानिवृत्त झाल्याने सेवापुर्ती निरोप समारंभ शहरातील सिंधी समाज मंगल कार्यालय येथे आज १२ वाजेच्या सुमारास आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थितीत पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

प्रा. गौतम निकम हे राष्ट्रीय विद्यालय सिनियर कॉलेज येथून प्राध्यापक पदावरून ६०व्या वर्षी सेवानिवृत्त झाले. याबाबत सेवापुर्ती निरोप समारंभ कार्यक्रम सिंधी समाज मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात महामानवाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व मशाल पेटवून करण्यात आली.

याप्रसंगी प्रा. गौतम निकम सर लिखीत एकलव्य आणि भिल्ल आदिवासी, क्रांतीकारी राघोजी भांगरे आणि आदिवासींचे लढे व मुलनिवासी आदिवासी निसर्गपुजक की हिंदू? आदी पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती संस्थापक अध्यक्ष शरद अण्णा तिगोटे (प्रजास्वराज्य पक्ष), संस्थापक अध्यक्ष दिपक कालिंगण (महा. मराठी सामाजिक संघ), अध्यक्ष कालिदासजी अहिरे (रा.म.से.उ.महा.), नगरसेवक रामचंद्र जाधव (चाळीसगाव), चेअरमन संजय घोडे (एकलव्य एज्यु), सचिव अॅड. कविता जाधव (वकील संघ चाळीसगाव), स्वच्छता निरीक्षक सचिन निकम (नगरपालिका चाळीसगाव), नगरसेवक काकासाहेब घोडे (चाळीसगाव), तालुकाध्यक्ष गजानन चंदनशिव (मानवहित लोकशाही पक्ष), आरोग्य निरीक्षक तुषार नाकवाल (न.पा. चाळीसगाव), कवी गौतमकुमार निकम, माजी.पं.स.सदस्य धनंजय मांडोळे (चाळीसगाव), संपादक निळकंठ साबळे, वकील संघ अध्यक्ष प्रमोद एरंडे (चाळीसगाव), राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष अल्लाउद्दीन भाई (जळगाव), महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संजयराव वाल्हेकर, तालुकाध्यक्ष संभाआप्पा जाधव (वंचित बहु. आघाडी), जिल्हाध्यक्ष गणेश शिरसाठ (मानवहित लोकशाही पक्ष), शिक्षक सतिश महाजन, अध्यक्ष संघपाल सोनवणे, जिल्हाध्यक्ष अशोक नाईक (ए.आ.ब.पा.नाशिक), भगवान रोकडे (सत्यशोधक चळवळी), चेअरमन महेश चव्हाण (मुकबधीर विद्यालय चाळीसगाव), रोशन जाधव, वक्ता मंगेश पाटील, सदानंद चौधरी, डॉ. व्हि.आर.मोरे, सचिव चंद्रकांत पाटील, तालुकाध्यक्ष संजय निकम (दलित पँथर), तालुकाध्यक्ष प्रदिप अहिरे (पी.आर.पी), योगेश पाटील आदीं उपस्थित होते.

Protected Content