विद्युत रोहित्रात हात घालून आत्महत्येचा प्रयत्न !

 

जळगाव : प्रतिनिधी । विद्युत रोहित्रात हात घालून आत्महत्येचा प्रयत्न तरुणाचे प्राण वाहतूक पोलिसांच्या प्रसंगावधानाने वाचले . आज सायंकाळी मध्यवर्ती बस स्थानकासमोरच्या आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळच्या विद्युत रोहित्राजवळ ही घटना घडली .

विद्युत रोहित्रात हात घालून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या या तरुणाने आपली ओळख नंतर पोलिसांना सांगितली . कैलास भांगे ( वय – ४० , रा -यवतमाळ ) असे त्याचे नाव आहे . अत्यंत विमनस्क अवस्थेत तो बराच वेळ रोहित्राजवळ उभा असल्याचे लक्षात आल्यावर या चौकात वाहतूक नियंत्रण करणाऱ्या पोलिसांनी त्याला हटकले आणि त्याचा आत्महत्येचा प्रयत्न असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले . वीज पुरवठा थोडा वेळ खंडित करून पोलिसांनी त्याचा रोहित्रातील हात काढला . त्याला नंतर वाहतूक पोलीस शाखेच्या कार्यालयात नेण्यात आले आणि जिल्हा पेठ पोलिसांना माहिती देण्यात आली . नंतरच्या कार्यवाहीचा तपशील मात्र लगेच समजू शकला नाही .

Protected Content