उध्दव ठाकरे यांची सर्वाधीक यशस्वी मुख्यमंत्री म्हणून नोंद होणार-आ. पाटील ( व्हिडीओ )

जळगाव सचिन गोसावी । कोरोनासारख्या आपत्तीतही मुख्यमंंत्री उध्दव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारने अतिशय उत्तम कामगिरी बजावली असून आजवरचे सर्वात यशस्वी मुख्यमंत्री म्हणून त्यांची नोंद होणार असल्याचे प्रतिपादन आ. किशोरआप्पा पाटील यांनी केले. महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त लाईव्ह ट्रेंडस् न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.

नुकतेच महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष झाले. यानिमित्त विविध पक्षाच्या आमदारांशी लाईव्ह ट्रेंडस न्यूज संवाद साधत आहे. या अनुषंगाने आमदार किशोरआप्पा पाटील यांच्याशी आज वार्तालाप केला असता ते म्हणाले की, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अतिशय विपरीत परिस्थितीतही अतिशय उत्तम कारभार चालवून विरोधकांच्या जणू काही कानातच वाजवली आहे. खरं तर वर्षभरातील सर्वात जास्त वेळ हा कोरोनाच्या प्रतिकारात गेला. मात्र या आपत्तीचा सरकारने अतिशय चांगल्या पध्दतीत सामना केला आहे.

आमदार पाटील पुढे म्हणाले की, अतिशय कठीण काळातही राज्य सरकारने शेतकर्‍यांनी दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी दिली. यात बहुतेक शेतकर्‍यांचे कर्ज माफ झाले. काही शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळाली नसली तरी ती लवकरच मिळेल असा आशावाद देखील त्यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की, विविध सर्वेक्षणांमध्ये उध्दव ठाकरे यांना सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून जनतेने पसंती दिली आहे. महाविकास आघाडी सरकारने सर्वच आघाड्यांवर अतिशय उत्तम कामगिरी केली असल्याचे प्रतिपादन आमदार किशोरआप्पा पाटील यांनी केले.

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/210887493895673/

Protected Content