माहेश्वरी महिला मंडळ व पांजरापोळ संस्थेतर्फे देवी भागवत कथेचे आयोजन

 

जळगाव, प्रतिनिधी | जळगाव जिल्हा माहेश्वरी महिला मंडळ व पांजरापोळ संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २४ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत दुपारी २.३० ते ६ या कालावधीत देवी भागवत कथेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात करण्यात आले आहे. या कार्यक्रमात ह.भ.प. दादा महाराज जोशी (जळगाव) हे देवी भागवत कथा सांगणार आहे.

देवी भागवत कथाचे प्रवक्ते ह.भ.प. दादा महाराज जोशी यांची शहरातील चिमुकले राममंदीर हीच कर्मभूमी असून ते गेल्या ५० वर्षांपासून रामसेवेत कार्यरत आहेत. त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षापासून म्हणजेच १९७१ पासून प्रवचनाला सुरूवात केली. त्यांनी विविध धार्मिक कथा, विविध पुराणांची सेवा गावो-गावी तसेच तिर्थक्षेत्री जावून केली आहे. त्यांनी नित्योपासना, मनोकामनापूर्ण करणारा हरी ‘हरीवरदा’ ग्रंथ, आपले सौभाग्य, आपली दिवाळी, देवी उपासना अशा आध्यात्मिक पुस्तकांचे लेखन केलेले आहे. अशा अगाध ज्ञान उपसकांच्या वाणीतून भागवत कथा श्रवणाचा सार्यांना लाभ होणार आहे. देवी भागवत कथेच्या या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी सर्व जळगाव परिसरातील, शहरातील भक्तगणांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जळगाव जिल्हा माहेश्वरी महिला मंडळ व पांजरापोळ संस्था यांच्या आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Protected Content