Home क्राईम पिंप्राळा परिसरातील बंद घरातून ४० हजारांचा ऐवज लांबविला

पिंप्राळा परिसरातील बंद घरातून ४० हजारांचा ऐवज लांबविला

0
52


रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पिंप्राळा परिसरातील मुंदळा मळा येथे तरूणाचे बंद घर फोडून रोख रकमेसह सोन्याचे दागिने, मोबाईल व रोकड असा एकुण ४० हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना बुधवारी ४ ऑक्टोबर रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. याप्रकरणी गुरूवारी ५ ऑक्टोबर रात्री १० वाजता  रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, केशव गणेश मंजाटे (वय-३३) रा. मुंदळा मळा पिंप्राळा, जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. मंगळवारी ३ ऑक्टोबर रात्री १० ते बुधवार ४ ऑक्टोबर पहाटे ३ वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने घराचा दरवाजा उघडून आत प्रवेश करत घरातून सोन्याची पोत, मोबाईल व रोकड असा एकुण ४० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे समोर आले आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर गुरूवारी ५ ऑक्टोबर रोजी तरूणाने रामानंद नगर पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्याने दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय सपकाळे करीत आहे.


Protected Content

Play sound