महेलखेडी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांना पाठीशी घालणाऱ्यांची चौकशी करा

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील महेलखेडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शालेय शिक्षण समितीत मुख्याध्यापक हे गेल्या चार वर्षांपासून स्वयंघोषीत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदावर कारभार पाहत आहे. हम करे सो कायद्या प्रमाणे वागणाऱ्या व त्यांना पाठीशी घालणाऱ्यांची चौकशी करून त्वरीत कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी यावल गटविकास अधिकारी यांच्याकडे आज गुरूवारी २३ सप्टेंबर रोजी निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यावल तालुक्यातील महेलखेडी जिल्हा परिषद मुलांची शाळेची शालेय शिक्षण समिती गेल्या ४ वर्षांपासून स्थापन झाली आहे.  ती नियमाप्रमाणे अद्याप बदल करण्यात आली नसल्याने पालकवर्गामध्ये मोठया प्रमाणावर नाराजी व्यक्त केली जात आहे. शाळेतील मुख्याध्यापक व तथा कथित स्वयंघोषीत अध्यक्ष व उपाध्यक्ष या त्रिमुर्तीच्या ‘हम करे सो कायद्या’च्या कारभारस पालकवर्गातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.  नियमानुसार शालेय समितीचा कालावधी हा फक्त दोनच वर्षाचा असतो, पण या समितीला ४ वर्ष झाले असले तरी अध्यक्ष व उपाध्यक्ष हे पदभार सोडण्यास तयार नाहीत.  अशा बेजबाबदारपणे वागणाऱ्या शालेय समितीचे स्वयंघोषीत अध्यक्ष व उपाध्यक्ष तथा त्यांना पाठीशी घालणाऱ्या या अभीभावात वागणाऱ्या शाळेच्या मुख्याध्यापकांची तात्काळ चौकशी करून या सर्वांवर शिस्तभंगाची कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली आहे .

 

या निवेदनावर ज्ञानेश्वर हिवरकर, रविंद्र न्हाळकर, सर्फराज तडवी, विश्वनाथ तायडे , जितेन्द्र पाटील , हरी महाजन , निसार तडवी , भिकन पटेल , संतोष न्हाळकर , कुर्बान तडवी , शशीकांत अडकमोल यांच्यासह आदी ग्रामस्थ पालकांच्या स्वाक्षरी आहे .

Protected Content