यावल येथे दिव्यांग बांधवांना गरजू वस्तूंचे वाटप

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल पंचायत समिती कार्यालयात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, शिक्षण विभाग (प्राथमिक ) व माध्यमिक आणि समाज कल्याण विभाग, गट साधन केंद्र व दिव्यांग कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग विद्यार्थ्यांना विविध गरजेच्या आवश्यक वस्तुसह युडीआयडी ओळखपत्र मान्यवरांच्याहस्ते वाटप करण्यात आले.

यावल पंचायत समितीच्या आवारात ३ डिसेंबर या जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधुन समग्र शिक्षण अभियान अंतर्गत समावेशित शिक्षण उपक्रम केंद्रच्या वतीने संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे उद्यघाटन पंचायत समितीचे विस्तार अधिकारी किशोर सपकाळे यांच्याहस्ते जागतिक पातळीवर दिख्यांनासाठी मार्गदर्शिका निर्माण करणारे हेलन किलर व ल्युपाश्चर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण करून करण्यात आले.

याप्रसंगी कार्यालय अधिक्षक सरवर तडवी, कक्ष अधिकारी जी.एम.रिंधे, शिक्षण विभागाचे गट शिक्षण अधिकारी एन.के. शेख, शालेय पोषण आहार अधिक्षक व्ही.सी.धनके, पंचायत समितीच्या दिव्यांग कक्ष अधिकारी ज्ञानेश्वर पाटील, केंद्र प्रमुख शाकीर, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक अशपाक सर हे प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षण विभागाचे राहुल पाटील यांनी केले. याप्रसंगी कार्यक्रमा संदर्भातील माहीती गटशिक्षण अधिकारी नईमुद्दीन शेख यांनी उपस्थितांना दिली .

Protected Content