कुपोषित बालक मृत्यू प्रकरण; त्रिसदस्यीय समितीकडून चौकशीला सुरूवात

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील वड्री येथील आदिवासी वस्तीवर एका कुपोषित बालकाचा शनिवार ३१ जुलै रोजी उपचारापुर्वीच मृत्यू झाला होता. यासंदर्भात चौकशीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी त्रिदस्यीय समितीची नेमणूक करण्यात आली. आज बुधवार ४ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता त्रिसदस्यीय समिती आदिवासी वस्तीवर येवून सदस्यांनी याप्रकरणी सविस्तर माहिती जाणून घेतली.

कुपोषणामुळे बालकाचा मृत्यू झाल्याने संपुर्ण यावल तालुक्यात खळबळ उडाली होती. यामुळे बाळाच्या कुटुंबियांवर मोठे संकट कोसळले आहे. तर आदिवासी वस्तीवर भितीचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणाची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी गंभीर दखल घेत. तिसदस्यीय समितीची नेमणूक करण्यात आली असून तीन दिवसात अहवाल सादर करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार वड्री शिवारातील आसराबारी आदीवासी वस्तीवर या प्रकरणाची सखोल  चौकशी व्हावी यासाठी त्रिसदस्य समिती आज बुधवार ४ ऑगस्ट रोजी दाखल झाली. 

याप्रसंगी चोपडा येथील तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रदीप लासुरकर, जिल्हा बालसंरक्षण आधिकारी योगेश मुक्तावार, पाचोरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अतुल पाटील, जिल्हा महिला व बालकल्याण विकास अधिकारी विजयसिंग परदेशी, लसीकरण अभियानाचे सहनिमंत्रक दिलावर तडवी यांनी मयत झालेल्या बाळाच्या कुटुंबातील आई वडील यांच्याशी संवाद साधुन कौटुंबिक व आरोग्य विषायाची सविस्तर माहिती देण्यात आली.

यावेळी उपस्थित आदीवासी बांधवांनी समिती समोर अडीअडचणी आणि समस्या सांगितल्या. दरम्यान फक्त मतदान घेण्यासाठीच राजकीय मंडळी आमच्याकडे येतात मात्र मतदानाचे काम संपले की, मग कुणीही आमच्याकडे फिरवुन पाहात नाही, अशी संत्पत प्रतिक्रीया आदीवासी बांधवांनी व्यक्त केली. यावेळी आमदार शिरीष चौधरी यांनी देखील आदिवासी वस्तीवर भेट दिली. त्यावेळी समितीच्या सदस्यांशी या प्रकरणाविषयी सविस्तर माहीती जाणुन घेतल्या. यावेळी पंचायत समितीच्या सभापती पल्लवी चौधरी, जिल्हा परिषद सदस्या सविता अतुल भालेराव, पंचायत समितीचे गटनेते तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शेखर पाटील, जिल्हाध्यक्ष पुरूजीत चौधरी, वड्री गावाचे सरपंच अजय भालेराव, यावलचे गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हेमन्त बऱ्हाटे यांच्यासह या विभागातील आरोग्य यंत्रणा हे प्रामुख्याने उपस्थित होती .

 

Protected Content