संचारबंदी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे गरजुंना मदत

जळगाव, प्रतिनिधी । वंचित समाजातील गरीब कामगार, कष्टकरी मजुर बांधवांना त्यांचा दैनंदिन खर्च भागण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे महानगर अध्यक्ष मुकुंदभाऊ सपकाळे यांच्या हस्ते ११ कामगारांना प्रत्येकी १ हजार रुपये रोख याप्रमाणे ११ हजार रुपयांचे वाटप करण्यात आले.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी देशात संचारबंदी लागू करण्यात आले आहे. या कालावधीत कष्टकरी समाजाला काम मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. हीबाब लक्षात घेता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे गरजुंना मदत करण्यात आली. यात सिद्धार्थ नगर येथील ९० नागरिकांना प्रत्येकी ५ किलो याप्रमाणे ४.५ क्विंटल गहू वाटप समितीचे कार्याध्यक्ष अमोल कोल्हे , सल्लागार प्रा डॉ प्रकाश कांबळे , संघटक आनंदा तायडे , कोषाध्यक्ष समाधान सोनवणे , सदस्य संजय सपकाळे , भारत सोनवणे , नाना मगरे , संदीप सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले . दिनांक ११ एप्रिल रोजी महात्मा फुले जयंतीचे निमित्ताने ३ क्विंटल गहू तांबापुरा भागातील कष्टकरी मजूर बांधवांना वाटप करण्यात येणार आहे . मदतीची आवश्यकता असणाऱ्या खऱ्या गरजूंना मदतीसाठी समिती प्रयत्नशील आहे . यासाठी बहुजन चळवळीला सहकार्य करू इच्छिणाऱ्या दानशूर व्यक्तींनी या मदत कार्यात धान्य अथवा आर्थिक सहकार्य देऊन आपले योगदान द्यावे असे आवाहन समितीतर्फे करण्यात येत आहे .

Protected Content